आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांकडे आत्मसमर्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. कमला रामसू गावडे नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी अशी त्या नक्षल्यांची नावे आहे. आतापर्यंत कंपनी सदस्य, एरिया कमिटी सदस्य यांच्यासह विविध दलमच्या १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन दलममधील इतर सदस्यही आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला गावडे ही कोरची दलममध्ये होती. २०११ मध्ये ती केकडी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. फुलगोंदी येथील चकमक टाहकाटोला येथील एकाच्या हत्येत सहभाग होता. शासनाने तिच्यावर लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 

 

नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी हा २०११ मध्ये छत्तीसगडमधील पल्लेमाडी दलममध्ये भरती झाला. तोळकेतील कोरेटीची हत्या, जक्के ग्रामपंचायतीत काळा झेंडा फडकावणे या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर लाखांचे बक्षीस होते. या दोघांनीही नक्षलविरोधी अभियानाचे अपर पोलिस महासंचालक डी. कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. 

बातम्या आणखी आहेत...