आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचा ‘चौकीदार’च घोटाळेबाजांना बाहेर सोडतोय;कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशाचे  ‘चौकीदार’च घोटाळेबाजांना देशाबाहेर सोडत असल्याचा आरोप ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नाव न घेता केला. भ्रष्टाचार रोखणाऱ्या  संस्था केंद्र सरकार उदृध्‍वस्‍त करीत असल्याचेही ते म्हणाले. 

 
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवारी आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. पंजाब नॅशनल बँकेतील एका शाखेतील व्यवस्थापक ११ हजार कोटींचे कर्ज देतो, यावर आश्‍चर्य व्यक्त करीत अॅड. भूषण म्हणाले, ‘कर्ज घेणारा नीरव मोदी देशाबाहेर पळाला. त्याने दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रिझर्व्ह बँकेला माहिती अधिकारात कर्जबुडव्यांची माहिती मागितली असता ती अजूनही रिझर्व्ह बँकेने दिलेली नाही.  बँकांमध्ये मोठे घोटाळे असून ते लपवण्याचा प्रयत्न सुरू अाहे. सीबीआयसारख्या संस्थेचे संचालकपद अनेक आरोप असलेल्या राकेश आस्थाना यांच्याकडे दिले गेले. ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदीचा घोटाळा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा अाहे. या खरेदीसाठी निविदा काढण्याची प्रक्रियाच केली नाही,’ असा अाराेपही त्यांनी केला.  


‘दिल्लीत लोकांनी विश्वास ठेवून आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता दिली. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कलाने हा पक्ष चालतो. या सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास झाला,’ अशी टीकाही त्यांनी केली.  


लोयांचा मृत्यू संशयास्पद  
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप अॅड. भूषण यांनी केला. आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. शर्मा यांच्या मते लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...