आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिट्टी वाजताच सीमेवर लाखोंची फौज तयार राहील; दिवाकर रावतेंचा भागवतांना टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून वादळ उठले असतानाच परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी या वादात उडी घेतली अाहे.  “आता शिट्टी वाजताच सीमेवर सुरक्षेसाठी लाखोंची फौज तयार राहील. तेव्हा पाकिस्तानला घाबरण्याचे कारण नाही,’ असा टोला रावतेंनी भागवत यांना लगावला.    


रावते म्हणाले, ‘नागपुरात सैन्याबद्दल आदर दिसून येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकतेच नेव्हीच्या अधिकाऱ्यांना खडसावले हाेते. सातशे किलोमीटर किनारपट्टीवर आमचे राज्य असल्याचे ते सांगतात. मग असे असताना, मुंबई हल्ल्याचे अतिरेकी कुठून आले ते त्यांनी सांगावे. सीमेवरील सैन्याबद्दल बोलले जाते. दहशतवादाबद्दल सांगितले जाते. मात्र, नेमका दहशतवाद काय आहे, हे पाकिस्तानात वाढदिवसाला चहा पिणाऱ्यांना कळणार नाही,’ असा टाेला रावते यांनी माेदींचे नाव न घेता लगावला.  ‘मराठी भाषा भवनासाठी समिती स्थापन करताना, त्याचे उपभवन उपराजधानीत होणे अपेक्षित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते एेरोली येथे स्थापन केले. यावरून त्यांचे मराठी प्रेम कळते, अशी टीकाही रावते यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...