आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर रेल्वे - प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नईमखान रहमान खान (रा. शिवाजी नगर चांदूर रेल्वे) याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तीस वर्षीय तरूणी व नईमखान एकमेकांना ओळखतात. दरम्यान मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पीडित तरुणी आईसोबत घरासमोर उभी होती. दरम्यान नईमखान घरासमोर आला व त्याने माझ्यासोबत प्रेमसंबंध का ठेवत नाही असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीवर लोखंडी सलाखीने हल्ला करून जखमी केले. प्रेमसंबंध ठेवले नाही तर जीवे मारण्याची धमकीही नईमखानने दिली. दरम्यान याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी रात्री याबाबत चांदुर रेल्वे पोिलस ठाण्यात तक्रार दाखल केली. या पीडितेच्या तक्रारीवरून नईमखान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, लवकरच दोषींवर कारवाई होईल, असे सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...