आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमसीत एमएस, एमडीच्या ८ जागा वाढल्या; एमसीआयची मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमएस आणि एमडी अभ्यासक्रमाच्या ८ जागांमध्ये वाढ झाली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची (एमसीआय) मान्यता मिळाल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात १५ विषयांमध्ये आता ३२ जागा उपलब्ध होणार आहे. 


भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात १५ विषयांमध्ये एकूण २४ जागांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एमडी-एमएस) सुरू करण्याची परवानगी भारत सरकार व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेेकडून मिळाली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे या वर्षापासून पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश मर्यादेत २ वरून ७ तर, जनरल मेडिसिन या विषयात १ वरून ४ अशी वाढ झाली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून १९८४ मध्ये विनाअनुदानित तत्वावर पीडीएमसीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर २०१६ पासून मान्यता देण्याकरिता एमसीआयकडून अनेकदा महाविद्यालयात उपलब्ध सोई-सुविधांच्या तपासण्या केल्या. मात्र त्रुटींची पूर्तता न झाल्याने मान्यता मिळाली नाही. परंतु त्यानंतर संस्था व प्रशासनाने त्रुटींची पूर्तता केली. त्यामुळे महाविद्यालयाला एमसीआयने पुढील पाच वर्षांकरिता मान्यता दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. महाविद्यालयाकडून जनरल सर्जरी, डर्म्याटाॅलॉजी, गायनॅकॉलॉजी या विषयांमध्ये वाढीव जागांसाठी प्रस्ताव एमसीआयकडे सादर केला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, अॅड. पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, केशव मेतकर, अॅड. ठुसे, सचिव खाडे उपस्थित होते. 


पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा 
अॅनाटॉमी-२ 
फिजिऑलाॅजी -१ 
पॅथाॅलॉजी - ७ 
मायक्रोबाॅयलाॅजी - २ 
फारमॅकोलॉजी - २ 
कम्युनिटी मेडिसिन -२ 
जनरल मेडिसिन - ४ 
सायकॅट्री - २ 
रेस्पिरेटरी मेडिसिन - १ 
डर्म्याटाॅलॉजी - १ 
जनरल सर्जरी - २ 
ऑर्थोपेडिक्स -३ 
ऑपथलमॉलॉजी -१ 
अॅनेस्थेशिया- १ 
गायनॅकाॅलॉजी -१ 


१२०० अासन क्षमतेचे सभागृह 
महाविद्यालयाच्या परिसरात १२०० आसन क्षमतेच्या समाजोपयोगी सभागृहाची निर्मिती केली जाणार आहे. १० कोटी खर्चून अमरावतीकर जनतेच्या सामाजिक कार्यासाठी या सभागृहाची निर्मिती केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...