आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकलीने प्रसंगावधान राखून स्वत:सह मैत्रिणीलाही 'सावरले'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा झोपडपट्टी परिसरात एका नवरदेवासोबत असलेल्या दोन आठ वर्षीय चिमुकलींसोबत लायटींग पकडणाऱ्या २६ वर्षीय युवकाने चॉकलेटचे आमिष देवून अंधारात नेले. यावेळी त्या युवकाने दोनपैकी एका मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केले. यावेळी चिमुकलीने प्रसंगावधान राखून या युवकाच्या हाताला चावा घेवून स्वत:ची सुटका केली व दोघीही पळत आईकडे आल्यात. चिमुकलीने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे दोघींनीही वेळ 'सावरली'. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. १८) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडला असून गाडगेनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

सुनील माणिकराव बोरखडे (२६, रा. खारतळेगाव ह. मु. मांडवा झोपडपट्टी, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. सुनील बोरखडे हा लायटींग पकडण्याचे काम करतो. बुधवारी रात्री एक नवरदेव राशी निघाला होता, त्यावेळी सुनील लायटींग पकडण्याचे काम करत होता. याचवेळी नवरदेवाच्या मागे असलेल्या पाहुण्यांमध्ये दोन आठ वर्ष वयांच्या दोन मुली होत्या. याच मुलींना सुनिलने चॉकलेट देतो, असे आमिष दिले. त्यामुळे या दोन्ही मुली त्याच्यासोबत बाजूला गेल्यात. सुनीलने अंधाराचा फायदा घेत दोनपैकी एका चिमुकलीशी अश्लील चाळे सुरू केले. चिमुकलीने या प्रकारामुळे सुनीलच्या हाताला चावा घेतला व तीच्यासोबत असलेल्या चिमुकलीला घेवून पळत आईजवळ पोहचली. घडलेला घटनाक्रम तीने आईला सांगितला. या प्रकारामुळे चिमुकलीच्या आईने गाडगेनगर ठाणे गाठून सुनील बोरखडेविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 


आरोपीस केली अटक 
चिमुकलीच्या पालकांनी तक्रार देताच लायटींग पकडणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला तसेच त्याचा तातडीने शोध घेऊन अटक केली आहे. मनीष ठाकरे,ठाणेदार गाडगेनगर. 

बातम्या आणखी आहेत...