आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: ‘प्रहार’च्या धमाकेदार ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांढरकवडा/यवतमाळ- पांढरकवडा नगर परिषदेत ‘प्रहार’च्या धमाकेदार ‘एन्ट्री’ने सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचा सफाया झाला आहे. आज, दि. १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत मतदारांनी प्रहार जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ टाकली. तर तब्बल १४ उमेदवारही निवडून दिले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सत्ता ताब्यात असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक, शिवसेनेला एक, तर भाजपाचे केवळ तीन उमेदवार विजयी झाले. 


पांढरकवडा नगर पालिकेच्या प्रभागातील १९ नगरसेवक आणि नगराध्यक्षांकरीता बुधवारी मतदान पार पडले. दरम्यान, आज, दि. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली अभिनय नहाते ह्यांना हजार ७८४ मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावरच्या भाजपाच्या श्रद्धा अनिल तिवारी यांना हजार ३१३ मते मिळाली. यात भाजपाच्या उमेदवाराचा तब्बल एक हजार ४७१ मतांनी पराभव झाला. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या राधिका संतोष बोरेले यांना तीन हजार ६८३, तर काँग्रेसला चौथ्यास्थानी समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या गौरी शंकर बडे यांना हजार ६९६ मते मिळाली. 


अपक्ष प्रिया वामन मंचलवार यांना १८६ आणि बसपाच्या पुष्पा वासुदेव शेंद्रे यांना ११७ मते मिळाली. नोटावर ९० जणांनी मतदान केले. दुपारी एक वाजतानंतर निकाल जाहीर करण्यात आला. प्रभाग क्रमांक एकमधून प्रहार च्या मंगला सिडाम, तर प्रभाग क्रमांक एक मधून सुभाष दरणे, प्रभाग क्रमांक दोन मधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुष्पलता पायघन, तर प्रभाग क्रमांक दोन मधून काँग्रेसचे शंकर बडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रहारचे पिंटू चिंचाळकर यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक तीनमधून प्रहारच्या जया जाधव, तीन मधून प्रहार चेे शंकर कुनघाडकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे सुबोध काळपांडे यांचा पराभव केला. भाजपासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची होती. 


आमदारांचे निवासस्थान असलेल्या या भागातून भाजपा उमेदवाराचा दुसऱ्यांचा दारून पराभव झाला हे विशेष. प्रभाग क्रमांक मधून प्रहार च्या मिना बुरांडे,प्रभाग क्रमांक मधून भाजपाचे बंटी उर्फ गजानन जुवारे हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे मो. मंसुर अ. हक यांचा अत्यल्प मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक मधून प्रहारचे योगेश उर्फ गोलू माधव कर्णेवार,प्रभाग मधून प्रहारच्या समिक्षा चोटपल्लीवार, प्रभाग क्रमांक मधून प्रहारचे राजू वंजारी, मधून हाजराबी मो. अली बैलीम, प्रभाग क्रमांक मधून प्रहारचे पवन कुडमत, मधून साफिया बेगम मो. शब्बीर, प्रभाग क्रमांक मधून उषा आराम,८ मधून उर्फे कालुभाई काझी, मधून संतोष बोरेले हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रहारचे राम वाघाडे यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक मधून भाजपाच्या रिता कनोजे,९ मधून भाजपाच्या विजया रोडे या विजयी झाल्या आहेत. या धक्कादायक निकालाने राजकीय पक्षांना सावरायला बराच वेळ लागेल. ‘प्रहार’ने आमदार बच्चु कडू, प्रमोद कुदळे, सलिमभाई खेताणी, जिल्हाध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवित अचलपुरच्या बाहेर प्रहारचा झेंडा रोवला आहे. 


गणित जुळविण्यात शिवसेना ‘नापास’ 
पांढरवकडा निवडणुकीत मोठ्या दिमाखात शिवसेनेनेे स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या त्या माध्यमातून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह इतरही नगर सेवकांनी निवडून येण्याचे गणित जुळविले होते. असे असताना शिवसेनेला नगर पालिका निवडणुकीतून पाहिजे त्या प्रमाणात यश मिळविता आले नाही. केवळ एक उमेदवार शिवसेनेचा निवडून आला आहे. यावरून अर्थकारणाच्या गणितात शिवसेना सपशेल ‘नापास’ झाल्याचे शहरात बोलल्या जात आहे. 


अहीर, मदन येरावार, तोडसाम यांना धक्का 
पांढरकवडा गाव केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदार संघात येते. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी भाजपचेच आमदार प्रा. राजू तोडसाम निवडून आले आहे. तर शेतकरी स्वावलंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनीसुद्धा अप्रत्यक्षमणे निवडणुकीत प्रचार केल्याचे बोलल्या जाते. विशेष म्हणजे पालकमंत्री मदन येरावार यांनीसुद्धा पांढरकवड्यात काही दिवस तळ ठोकलेला होता. चोहोबाजूने प्रचारात भाजप नेत्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. असे असताना केवळ तीन जागेवर भाजपाला समाधान माणण्याची वेळ आली. तर प्रहार पार्टीने मुसंडी मारली आहे. 


‘बडे’वरचा विश्वास ‘मोघें’ना नडला 
गेल्यादहा वर्षांपासून पांढरकवडा नगर पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. निर्वीवाद वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेसला यंदाही यश मिळेल, असे स्वप्न पडत होते. मात्र, ह्या स्वप्नाचा प्रहार जनशक्ती पार्टीने चुराडा केला. माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणारे माजी नगराध्यक्ष शंकर बडे हे अत्यल्प मते घेवून काँग्रेसच्या तिकिटावर निवडूण येणारे एकमेव उमेदवार आहेत. 


एकंदरीत माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांच्यावर विश्वास टाकून माजीमंत्र्यांनी उमेदवारांची निवड केली होती. हा त्यांचा अतिविश्वास त्यांनाच नडल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट दिसून आले. यातून सावरायला काँग्रेसला वेळ लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...