आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचे सरकार्यवाह बदलणार की भय्याजी जाेशींनाच मिळणार संधी? होसबळेंचीही चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ९ मार्चपासून नागपुरात सुरू हाेत अाहे.  या बैठकीत प्रामुख्याने सरकार्यवाह पदाची निवडणूक होणार आहे. सध्या सरकार्यवाह पदावर असलेले भय्याजी जोशी यांना या पदाची तिसरी टर्म मिळणार की त्यांच्या जागी नवी व्यक्ती या पदावर येणार, याचा निर्णय या बैठकीत हाेईल. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.  

  
तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघ परिवारातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघटनेतील कामकाजाच्या आढाव्यासह आगामी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीत होत असते. याशिवाय महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयांवर ठराव केले जातात. यावर्षी या बैठकीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर चर्चा झडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किरकोळ क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मुभा, देशभरातील शेतीची दुरवस्था आणि शेतकऱ्यांपुढील संकट यासह अनेक विषयांवर प्रतिनिधींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी जिवाला धोका असल्याचा आरोप करीत खळबळ माजवून दिली होती. हा विषय बैठकीत उपस्थित होऊ शकतो.

 

होसबळेंचीही चर्चा    
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची पदावरील दुसरी टर्म पूर्ण होत असल्याने सरकार्यवाह पदाच्या निवडीची प्रक्रिया प्रतिनिधी सभेत पार पाडली जाणार आहे. जोशी यांना तिसरी टर्म मिळून ते या पदावर कायम राहणार की या पदावर नवी व्यक्ती येणार, याबाबत संघ वर्तुळात उत्सुकता आहे. या पदासाठी २०१६ च्या प्रतिनिधी सभेत सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या नावाची चर्चा होती. ती या वर्षीही कायम आहे. याशिवाय संघात अन्य काही संघटनात्मक बदलही अपेक्षित असून विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वबदलाचीही चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...