आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो रोज करायचा वर्गातील 3 विद्यार्थीनींवर अत्याचार; जिल्हापरिषद शाळेतील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गोंदिया जिल्ह्यातील बुधेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील गोपाल जनबंधू या शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.   गोपाल जनबंधू नामक या शिक्षकाची ६ महिन्यापूर्वीच बुधेवाडात बदली झाली आहे.    

 
तो तिसरी व चौथीच्या वर्गाला शिकवायचा. महिनाभरापासून सहकारी शिक्षक चहापानाकरिता बाहेर जाताच तो रोज वर्गातील ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत होता. त्याचे कृत्य असह्य झाल्याने मुलींनी पालकांना याची माहिती दिली. पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपीवर बलात्कार व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.  


या घटनेला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा आरोपी पालकांनी केला आहे. शाळेत ५० च्या वर विद्यार्थी नसल्याने जिल्हा परिषदेने शाळेत २ शिक्षक व एका शिपायाची नेमणूक केली. मात्र, शाळेत २५ पेक्षा जास्त मुली असूनही एकही महिला शिक्षक किंवा महिला परिचारिकेची नेमणूक केली नाही, असा पालकांचा आरोप आहे. जनबंधूने यापूर्वीच्या शाळेमध्येही असे कृत्य केले काय, याचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...