आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिवशाही'त आजी माजी आमदारांना शाही स्थान; ज्येष्ठ, अंधांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्य परिवहन महामंडळाची आरामदायक बस 'शिवशाही'मध्ये आमदार, माजी आमदारांना नि:शुल्क प्रवास करण्याची सुट देण्यात आली. मात्र ज्येष्ठ नागरिकांसह, अंध, अपंगांना कोणतीही सवलत दिली नाही. राज्य परिवहन मंडळाच्या या धोरणाबाबत ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र रोष आहे. 


शिवशाही महागडी असल्याच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी असतानाच ज्येष्ठ नागरिकांनी साधारण व एशियाडप्रमाणे या बसच्या तिकीटांमध्ये सवलत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून आम्ही ज्या एसटीला आपले मानतो तिचे दर जर खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे असतील, तर मग महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये अन् खासगी ट्रॅव्हल्समध्ये अंतर ते कोणते असा प्रतिप्रश्न महामंडळ अधिकाऱ्यांना विचारला आहे. राज्यभरात महानगरांपर्यंत मोठ्या दिमाखात धावत असलेल्या शिवशाहीमध्ये आरामदायक प्रवास करण्यापासून आम्हाला वंचित का ठेवले जात आहे? याआधी एसटीतून आम्ही राज्यभरात प्रवास करत होतो. आम्हाला सर्वसाधारण लाल बस आणि एशियाडमध्ये अर्धे तिकीट लागायचे. मात्र शिवशाहीपासून आम्हाला वंचित ठेवले जात आहे. सर्वच ज्येष्ठ नागरिकांना सामान्य बसच्या तिकिटांपेक्षा ९० ते १०० रुपये दर जास्त देऊन शिवशाहीतून प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे ते शिवशाहीने प्रवास करणे टाळतात. 


शिवशाही एसटी बसबाबत मुख्यालयाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना या बसमध्ये सवलत दिली नाही. त्यामुळे आमचाही नाइलाज आहे. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी बदल झाले, तर ते आम्हीही लागू करू. 
- डाॅ. श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक. 


शिवशाही...
- शिवशाही, साधारण बसच्या सवलती व फरक 
- आमदार व माजी आमदारांना िन:शुल्क 
- १२ वर्षांखालील मुलांना अर्धे तिकीट 
- आवडेल तेथे प्रवासाच्या मासिक पासेस 


साधारण बस... 
- ज्येष्ठांना तिकीट शुल्कात ५० % सवलत 
- स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र, द्रोणाचार्य, अर्जुन, छत्रपती पुरस्कार विजेत्यांना वार्षिक नि:शुल्क पास 
- अॅक्रिडेशनप्राप्त पत्रकारांना १० हजार किमी.पर्यंत मोफत प्रवास. 
- विद्यार्थ्यांसह दहावींनंतर विद्यार्थिनींना तिकीट दरात ६६.५ टक्के सवलत 
- दिव्यांगांना ७५ टक्के, अंधांना १०० टक्के सवलत 

बातम्या आणखी आहेत...