आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना एनसीसीद्वारा मानद कर्नल मानांकन सन्मान प्रदान करण्यात आला. विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना अमरावती एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरचे ब्रिगेडीयर संजीव यादव यांनी प्रमाणपत्र व बॅटन देवून आज (२१ मे) सन्मानित केले.
यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी उपस्थिती होती. मानद कर्नल मानांकन स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी सर्वप्रथम भारत सरकारचे आभार मानले. ब्रिागेडीअर संजीव यादव यांनी मार्गदर्शन करताना एनसीसी युवकांचे फार मोठे संघटन असून देशासाठी सक्षम युवक घडवण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सात ग्रुप असून ६२ बटालियन, २२ विद्यापीठे, ५०६ महाविद्यालये आणि ८४४ शाळांमधून विद्यार्थी घडवण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे केल्या असल्याचे यादव म्हणाले. एक लाखांपेक्षा जास्त एनसीसी कॅडेट असून त्यामध्ये मुलींची संख्या तीस टक्के आहे.
एनसीसीचा उपक्रम राबवण्यासाठी विद्यापीठाचे फार मोठे सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला कुलगुरूंना एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. प्रास्ताविकेतून कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी कुलगुरूंचे कार्य व उपलब्धीवर प्रकाश टाकला. कर्नल व्ही. रिचर्ड यांनी संजीव यादव यांचा परिचय करून दिला. संचालन डॉ. निरज घनवटे यांनी केले तर आभार क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी मानले. कार्यक्रमाला अॅड. पद््माताई चांदेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक कळंबे, डॉ. डी. डब्ल्यू. निचित, अधिष्ठाता डाॅ. स्मिता देशमुख, डॉ. मनिषा काळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जे. डी. वडते, माजी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे, एनसीसी कर्नल विक्रम करांडे, कर्नल व्ही. रवी राव, कॅप्टन शीला मॅथ्यूज, विद्यापीठ विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.