आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना सरकारमुळे रा.स्व. संघ वाढला, ना संघामुळे माेदी सरकार सत्तेत! - भय्याजी जाेशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाढ ही केंद्रातील भाजप सरकारमुळे नव्हे तर स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमांमुळेच झाली आहे. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजपची सत्ता संघामुळे आल्याचेही आपण मानत नाही, असे स्पष्टीकरण  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी चौथ्यांदा पदाची सूत्रे हाती घेतल्यावर रविवारी माध्यमांशी बोलताना दिले. २०१९ मध्ये सर्वसामान्य जनता विद्यमान सरकारच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.   


‘२०१४ प्रमाणे २०१९ मध्येही संघ परिवार भाजपच्या पाठीशी उभा राहणार काय?’ या प्रश्नावर बोलताना जोशी म्हणाले, किसी के कारण कोई आता है, जाता है.. यावर आमचा विश्वास नाही. जो येतो तो स्वबळावर आणि जातो स्वत:च्या कामामुळे. संघाचे काम हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमांमुळेच वाढले. संघावर बंदी आल्यावर प्रत्येक वेळी आमचे काम दुप्पट वेगाने पुढे गेले. त्यामुळे २०१४ मधील निवडणुकीचा संदर्भ येथे योग्य नाही. संघामुळे भाजपचे सरकार आले, हेदेखील मान्य नाही. त्या वेळची परिस्थिती त्याला कारणीभूत ठरली, २०१९ मध्ये संघ भाजपच्या पाठीशी उभा राहील की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आताची परिस्थिती पाहता सामान्य माणूस मात्र सरकारच्या पाठीशी उभा राहील, असे दिसते. काही चांगल्या गोष्टी देशात घडत आहेत. त्याचा सरकारला लाभ होईल. राजकीय उलथापालथ कधीच सांगता येत नाही. काही गोष्टी भविष्याच्या अधीन असतात, असेही जाेशी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...