आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Triangle: पहिली असताना दुसरीचा नाद आला एका नवरोजीच्या अंगलट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- पहिली पत्नी जीवंत असतानाही दुसऱ्या एका मुलीला खोटी माहिती देवून तीच्याशी लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाना यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरूवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. या नवरदेवाची पहिल्या पत्नीने जळगाव येथे दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 


रतीलाल नंदलाल जैन वय ३८ वर्षे असे त्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या नवरदेवाचे नाव आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार रतीलाल जैन याचे सिंधू उर्फ उषाबाई शामराव भिस या महिलेसोबत २०१६ मध्ये रजिस्टर लग्न झाले होते. त्यानंतर तो सिंधु यांच्यासोबत एका रेल्वेमध्ये जात असताना त्याने सिंधु यांना रेल्वेत एकटे सोडून पळ काढला होता. त्यानंतर सिंधु यांनी रतीलाल याच्या घरी जावून त्याचा शोध घेतला होता. मात्र तो फरार होता. दरम्यान तो दोन वर्षांपासून त्याच्या घरी आल्याचे त्यांना माहिती झाले होते. यादरम्यान रतीलाल याने यवतमाळातील एका कुटुंबियांना खोटी माहिती सांगून त्यांच्या परिवारातील मुलीसोबत दुसऱ्या लग्नाचा डाव रचला होता. यासंदर्भात सिंधु यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने जळगाव जिल्ह्यातील मारवड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यात पती विरोधात तक्रार देवुन २१ जुन रोजी त्याचे दुसरे लग्न असल्याचे सांगितले. मात्र हे लग्न कुठे आहे त्याची माहिती त्यांना नव्हती. या तक्रारीवरुन मारवड पोलिसांनी यवतमाळ येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांना या संदर्भात माहिती दिली. 


ही माहिती मिळताच जगताप यांनी तातडीने सुत्रे हलवीत घटनास्थळ गाठून माळीपुऱ्यातील महावीर भवन येथून लग्नाच्या बेतात असलेल्या रतीलाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सोबत आणून त्याचे समूपदेशन करण्यात आले. इकडे रतिलाल दुसरे लग्न करणार असलेल्या मुलीला अगदी काही वेळापूर्वी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यांनी या संदर्भात कुठलीही तक्रार देण्याचे टाळत त्याच्याकडून खर्च वसुल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

बातम्या आणखी आहेत...