आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आणि उद्धव ठाकरे हेच सरकारचे खरे लाभार्थी; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे भाजप आणि उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी अाहेत. देश खड्ड्यात जातोय म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेच मंत्री खड्डा खोदायला भाजपला मदत करीत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी रविवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात पत्रकार परिषदेत केली. शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कायदा आणि सु्व्यवस्था अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचा इशारा देत विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली.     


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील या वेळी उपस्थित होते.   
तीन वर्षांच्या भाजप-शिवसेनेच्या राजवटीत महाराष्ट्र उध‌्ध्वस्त झाल्याची टीका विखे पाटील यांनी केली. ‘जनतेला कुठल्याच पातळीवर दिलासा मिळत नसल्याने सर्वसामान्यांना हे सरकार आपले वाटेनासे झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी आजवर ९३ वेळा सत्तेबाहेर पडण्याचे इशारे दिलेत. आता ते लवकरच इशाऱ्यांची शंभरी गाठतील,’ असा टाेलाही त्यांनी लगावला. 

 
पारदर्शकता झाली वेडी

शिवाजी महाराजांच्या नावावर सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली. ऑनलाइनच्या नावावर कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झाला. मोठमाेठी आकडेवारी मांडणाऱ्या सरकारने नेमकी कोणाची कर्जमाफी केली, याची नावे सरकार जाहीर का करीत नाही? फडणवीस सरकारच्या राजवटीत पारदर्शकताच वेडी झाल्याची टीकाही विखेंनी केली. राज्यात सर्वत्र बीटी कापसावर बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. ‘हेच का अच्छे दिन’ असे नमूद करून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र बिहारच्या पुढे जातोय. मुन्ना यादवसारखे मुख्यमंत्री समर्थक गुन्हेगार मोकाट फिरत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी झाल्याची टीकाही विखेंनी केली.  

 

पुढील स्लाईडवर वाचा, मुख्यमंत्र्यांचे मोबाइल डिटेल्स तपासा : धनंजय मुंडे ...

बातम्या आणखी आहेत...