आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीचे केस धरणाऱ्याला पोलिसांनी त्वरित पकडले; पोलिसांनी तासाभरात केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रतिक्षा मेहत्रे खुनप्रकरण, त्यानंतर भरस्त्यात युवतीवर गरम तेल फेकल्याचे प्रकरण या दोन्ही घटना ताज्या असतानाच गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत भर रस्त्यावरच एका २२ वर्षीय तरुणीचे केस पकडून तीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. ८) घडली. या प्रकाराची माहीती गाडगेनगर पोलिसांना माहीती मिळताच अवघ्या एका तासात अनोळखी असलेला हा आरोपी पोलिसांनी अटक करून आणला होता. 


अमोल बंडू मातखेडे (२५, रा. महेंद्र कॉलनी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी एक २२ वर्षीय युवती व्हीएमव्ही कॉलेज ते शेगाव नाका या मुख्य मार्गावरून पायदळ जात होती. त्याचवेळी अमोल त्या मुलीजवळ आला तीला अश्लील शिवीगाळ करू लागला. इतकेच नाही तर त्याने मुलीचे केस पकडून तीला मारहान सुरू केली. अचानकपणे झालेल्या या प्रकाराने मुलगी चांगलीच घाबरली तीने बचावासाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीजवळ धाव घेतली. नागरीक येताच त्याने पळ काढला. 


ही माहीती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. गाडगे नगरचे ठाणेदार मनिष ठाकरे घटनास्थळी पोहचले त्यांनी युवतीची विचारपूस केली मात्र केस ओढणाऱ्याचे नाव सुध्दा तीला माहीती नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आपल्या स्तरावर शोध मोहीम राबवली. त्याला अवघ्या एका तासात महेंद्र कॉलनी परिसरातून अटक केली. त्याला अटक करून युवतीचे केस का ओढले असे पोलिसांनी त्याला विचारले असता त्याने सांगितले कि, त्याची एका मुलीसोबत मैत्री करण्याची ईच्छा आहे. ज्या मुलीसोबत मैत्रीची ईच्छा आहे, ती या युवतीची घनिष्ठ मैत्रीण आहे. आपल्याबद्दल काही चुकीची माहीती देवून मैत्रिणीला आपल्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न ही युवती करू शकते, असा समज अमोलला झाला त्याने याच गैरसमजातून तीला शिवीगाळ करून भर रस्त्यात तीचे केस ओढले होते. 


तिन्ही घटनांना प्रेमप्रकरणाची किनार
पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या राहुल भड नामक युवकाने २३ नोव्हेंबरला भर रस्त्यात प्रतिक्षा मेहत्रेचा चाकूने भोसकून खुन केला. आपल्याशी सोडून दुसऱ्या युवकासोबत मैत्री केल्याची बाब ऐकल्यामुळे सुड घेण्याच्या भावनेतून सुशील मेश्राम या युवकाने डिसेंबरला भर रस्त्यात मैत्रीणीच्या तोंडावरच गरम तेल फेकून जाळले आहे. तसेच शुक्रवारी आवडणाऱ्या युवतीला आपल्याबद्दल काही सांगून तीला दूर करण्याचा संशय आल्यामुळे अमोल मातखेडेने भरस्त्यात युवतीचे केस ओढून तीला शिवीगाळ केली आहे. या तिन्ही घटना शहरातील वातावरण किती गढूळ युवतींसाठी धोकादायक झाले आहे, याची जाण करून देत आहे. या तिन्ही घटनांना प्रेम प्रकरणांची किनार असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. 


पोलिसांनी दाखवली कार्यतत्परता 
शुक्रवारीदुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील शहरात होते. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी गृहराज्यमंत्री पाटील हे व्हीएमव्ही महाविद्यालयातच होते. त्यामुळे गाडगेनगरचे ठाणेदार ठाकरे इतर ताफा व्हीएमव्हीतच होता. त्याचदरम्यान ही घटना घडली. त्यावेळी ठाणेदार काही कर्मचाऱ्यांना घटनेची माहीती मिळताच गांभीर्य लक्षात घेवून घटनास्थळ गाठले कोणतीही माहीती नसताना अवघ्या एका तासात आरोपीला पकडून गजाआड केले. 

बातम्या आणखी आहेत...