आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवाद्यांचा आज बंद; व्यापारी संघटनांचा पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्याची मागणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विदर्भ राज्य आंदोलन समितीसह सर्व विदर्भवादी संघटनांनी सोमवारी ‘विदर्भ बंद’ ची हाक दिली आहे.

 
विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझासह तमाम विदर्भवादी संघटनांनी बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. नागपूर, अमरावतीसह सर्व जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला विदर्भ बंद ने सलामी दिली जाणार आहे. विदर्भ राज्याची मागणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा बंद आयोजित करण्यात आला आहे. 


भाजपने वारंवार विदर्भ राज्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे जनतेने कडकडीत बंद पाडून सरकारवर पर्यायाने भाजपवर आपला संताप व्यक्त करावा, असे आवाहन विदर्भवादी संघटनांनी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. शेतीमालास योग्य दर देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचे आमिष दाखविणाऱ्या भाजपला सत्ता येताच या आश्वासनाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, सरकारची कर्जमाफीही पोकळ घोषणा ठरली आहे. कर्जमाफीचा कोणालाच फायदा होत असून त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंद मध्ये सक्रियपणे उतरावे, असेही आवाहन समितीने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...