आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर छापा; तरुण-तरुणी आढळले \'त्या\' अवस्थेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर रविवारी रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होते. ज्यावेळी धाड टाकली गेली, त्यावेळी अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले.  धरमपेठ भागात असणाऱ्या या हॉटेलचे नाव ‘रुफ नाईन’ असे आहे.

 


हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो.  मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अनधिकृतपणे हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं उभे राहिले? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. 
दरम्यान, या हॉटेलमधील एक पुरुष कर्मचारी आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...