आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकलूजची लावणी स्पर्धा सुरू ठेवण्याचा फेरविचार; मोहिते पाटलांचे सुतोवाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धा सुरू ठेवण्यासंबंधी लवकरच विशेष बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय झाला तर नवीन पिढीकडे स्पर्धेची सूत्रे देण्याबाबत विचार केला जाईल, असे या स्पर्धेचे जनक जयसिंह मोहिते यांनी सांगितले.

 
जयसिंह मोहिते यांनीच काही दिवसांपूर्वी लावणी स्पर्धा बंद करण्याची घोषणा केली होती. ही परंपरा खंडित करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह लावणीप्रेमींनी केले होते.  अकलूजमध्ये १९९३ पासून आयोजित केली जाते. २५ वी राज्यस्तरीय लावणी-नृत्य स्पर्धा सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील अकलुजमध्ये पार पडली. मावळत्या स्पर्धेत बहुतांशी कलावंतांनी लोककलेच्या या आदर्श व्यासपीठाने आम्हाला किती अवसान दिले आणि हे बंद झाल्यावर काय होईल, अशा आशयाच्या लावण्या सादर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.


स्पर्धेतील निकाल
प्रथम क्रमांक :
पौर्णिमा मयूरी नगरकर, जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र, सणसवाडी  
द्वितीय क्रमांक : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी, यवत - चौफुला, जि. पुणे  
तृतीय क्रमांक : बबनबाई मीरा पडसाळीकर, पद्मावती कला केंद्र मोडनिब, जि. सोलापूर
नंदा उमा इस्लामपूरकर, नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...