आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर संघप्रणीत कामगार संघटना नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात कामगारांविषयी काहीच नसल्याने नाराज झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय मजदूर संघाने (भामसं) शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. मात्र, नागपुरात दबावामुळे निदर्शने टाळून फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भामसंच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी खूप काही असले तरी अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी तसेच इतर क्षेत्रांतील कामगारांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. मध्यमवर्गही दु:खी असल्याचे केंद्रीय कार्यालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नाेटबंदी, जीएसटी आणि बँक व्यवहाराच्या डिजिटलायझेशनमुळे सरकारची तिजोरी तुडुंब भरलेली असताना सरकारने कामगारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भामसंने नाराजी व्यक्त केली आहे.      


अर्थसंकल्पात कामगारांसाठीही काही नव्हते. याच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यालयाने सर्व राज्ये तसेच प्रांत कार्यालयांना निदर्शने  करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...