आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी शहरात राष्ट्रसंत सेवालाल जयंती उत्साहात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी (यवतमाळ)- राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती आर्णी शहरात प्रथमच उत्साहात साजरी करण्यात आली. अर्थतज्ज्ञ, भविष्यवेत्ते, नितीकार, व्यापारी, विज्ञानवादी, धर्मप्रेमी, निसर्गप्रेमी, मानवतावादी अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले जगदगुरू राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्णी शहरातून दुपारी बारा वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागातील युवा वर्ग या मिरवणूकीत सहभागी झाला होता. दरम्यान युवा नेते अनिल आडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिरवणूकीला सुरूवात केली.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...