आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना संपर्क नेते रावते आजपासून घेणार आढावा; विदर्भातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर मंथन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेचे संपर्क नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे उद्यापासून नागपुरात शिवसेनेचा पूर्व विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक आढावा घेणार आहेत. 


लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात येऊन संपूर्ण विदर्भातील संघटनात्मक स्थितीचा लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला होता. त्यानंतर आता संपर्क नेते दिवाकर रावते यांच्याकडूनही आढावा घेण्यात येणार आहे. नागपुरात रवी भवन येथे उद्या बुधवारी गोंदिया आणि भंडारा तसेच नागपूर या तीन जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. त्यानंतर गुरुवारी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक अमरावतीला होणार आहे. 


पूर्व विदर्भात शिवसेनेची स्थिती कमजोर आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कार्यकर्त्यांचे नेटवर्क वाढवणे, अन्य पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात आणून शिवसेनेचा प्रभाव वाढवण्यासह पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी या विषयांवर बैठकीत खल होणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी रावते अमरावती व अकोला येथे पश्चिम विदर्भाच्या जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...