आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यामध्ये प्रथमच अमरावतीच्या युवतीचे सहा अवयव दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेनडेड दीक्षा मंडपे - Divya Marathi
ब्रेनडेड दीक्षा मंडपे

अमरावती- ब्रेनडेड झालेली बेलपुरा, अमरावती येथील २५ वर्षीय युवती दीक्षा मंडपेच्या शरीरातील फुफ्फुस, हृदय, दोन्ही मुत्रपिंड, यकृत, दोन्ही डोळे व पायाची त्वचा असे सहा अवयव राज्यातील मुंबई, नागपूर येथील गरजू रुग्णांसाठी आज (दि.२२ एप्रिल) दान करण्यात आले. यामुळे राज्यातील किमान सहा गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. एकाच रुग्णाच्या शरीरातील एवढ्या मोठ्या संख्येत अवयव दान करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती डाॅ. अविनाश चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली. 


दिक्षाच्या मेंदूत बालपणापासूनच पाणी व्हायचे. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूतून नळी पोटात सोडण्यात आली होती. १९ एप्रिल रोजी स.८ वाजता अचानक ही नळी बंद झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. अशा स्थितीत तिला डाॅ. निचत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिचा मेंदू काम करीत नव्हता. शहरातील मेंदुविकारतज्ज्ञांनी दिक्षाचा मेंदू मृतावस्थेत आल्याचा निर्वाळा दिला. 


इतरत्र हलवूनही कोणताच फायदा होणार नाही, असेही मत तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांपुढे अवयवदानाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यांनीही लगेच मान्यता दिली. 


त्यामुळे मग दिला डाॅ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात अवयवदानासाठी दाखल करण्यात आले. येथे डाॅक्टरांच्या पथकाने अहोरात्र परिश्रम घेऊन तिचे अवयव जिवंत ठेवले. 


डाॅ. अविनाश चौधरी यांचा दावा, शरीरातील अवयव दानाचा भावंडांनी घेतला निर्णय 
हवाई रुग्णवाहिकेद्वारे हृदय व फुफ्फुस सायंकाळी ५ च्या सुमारास बेलोरा विमानतळावरून मुंबईच्या मुलूंड येथील फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एका २५ वर्षीय युवतीच्या शरीरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपित केले जाणार असल्याची माहिती तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पथकाने दिली आहे. 


अमरावती विभागातून हृदय व फुफ्फुस पाठवण्याची पहिलीच वेळ 
अमरावती विभागातून हृदय व फुफ्फुस दान करण्यासाठी पाठवण्याची ही पहिलीच वेळ होय. याआधी दोनदा प्रयत्न करूनही तसेच ब्रेनडेड झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांची इच्छा असतानाही दोन्ही वेळा हृदय दान करता आले नव्हते. या अपयशाचे शल्य असल्यामुळे यावेळी आम्ही हृदय दान करता यावे म्हणून पूर्ण खबरदारी घेतली व आधीपासूनच तशी सोय केली, अशी माहिती शासनाने अवयव दानाची अधिकृत परवानगी दिलेले डाॅ. चौधरी यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...