आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पिकांवर ड्रोनद्वारे कीडनाशकाची फवारणी; कृषी आयुक्त सचिंद्र सिंग यांनी दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विषारी कीडनाशक फवारणी दरम्यान विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात ४० पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूरांचा मृत्यू झाला हाेता. येत्या हंगामात यावर नियंत्रणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोनव्दारे फवारणी केली जाणार आहे. या बाबत विचार सुरू असल्याची माहिती कृषी आयुक्त सचिंद्र सिंग यांनी दिली. 


सर्व आयाम तपासून या बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. दिल्लीस्थित कृषीभवनमध्ये या संदर्भाने आय. आय. टी. बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सादरीकरण केले. यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी शिफारस नसलेल्या रसायनांचे मिश्रण करुन त्याची फवारणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी तर कापसाला शिफारस नसलेल्या किडनाशकाची फवारणी केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले होते. शिफारस नसलेल्या किडनाशकाची अनियंत्रित फवारणी करणाऱ्या तब्बल २२ शेतकऱ्यांना एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जीव गमवावा लागला. राज्यात फवारणी दरम्यान विषबाधेने मरणाऱ्यांची संख्या ४० वर गेली होती. त्यानंतर विविध समित्यां मार्फत चौकशी करून विषबाधेमागील कारणे शोधली. आय. आय. टी. बंगळूरूच्या विद्यार्थ्यांनी फवारणीसाठी ड्रोनच्या वापराचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. दिल्लीतील कृषी भवनमध्ये देशपातळीवरील कृषी अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्रात येत्या हंगामात ड्रोनव्दारे फवारणीची उपयोगीता तपासली जाणार आहे. 


अशी होईल फवारणी 
या सादरीकरणाला उपस्थित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनव्दारे १५ लिटर किडनाशक फवारणी शक्य होईल. ड्रोनची बारा फुटापर्यंत उंची अपेक्षीत धरण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून एक हेक्टर फवारणी अवघ्या साडेचार मिनीटात होणार आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावरील या उपक्रमासाठी भाडे तत्वावर ड्रोन घेऊन फवारणी करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...