आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ध्यातील बारा कुटुंबीयांचा शासनाला आत्मदहनाचा इशारा; महाराष्ट्र दिनी करणार अांदाेलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- शेतकरी आत्महत्या प्रकरण ताजे आहे. यात आणखी भर पडत असल्याचे या होत असलेल्या राष्ट्रीय राजमार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाने जमीनी हस्तगत करणे सुरू केल्याने,त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत अाहे. येत्या महाराष्ट्र दिनाला देवळी तालुक्यातील भिडी येथील १२ कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा शासनाला दिला आहे. 


भिडी येथील शेतीचे आर्थिक नुकसान झालेले शेतकरी बळीराम उदेभान डोंगरे, अशोक चंद्रभान भांदककर,संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अरुण नीळकंठ हर्षबोधी,विलास पांडुरंग नगराळे, अनिल नीळकंठ मुरार, मोहन नीळकंठ मुरार,निलू नारायण गायकवाड, जगन मारुती भुजाडे, रमेश शंकरराव भुजाडे,लक्ष्मण सूर्यभान मेसेकर,चिंधुजी नीळकंठ मानकर, गौतम नीळकंठ मुरार हे असून, या सर्व शेतकऱ्यांनी महामार्गाचे लवाद प्रमुख अतिरिक्त आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना १ मे कामगार दिनी आत्मदहन करणार असल्याचे पत्र दिले आहे. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ३६१ च्या बुटीबोरी वर्धा व वारंगा फाटा पर्यंतचे काम वेगात सुरू आहे. 
यात भूसंपादनाच्या मामला क्रमांक आठ मधील जागा तसेच घरबांधकामाची फेरमोजणी करावी व त्याच जागेचा व जमिनीचा मोबदला देण्यात यावा. या राजमार्गामुळे आमची घरे केव्हाही जमीन दोस्त होऊ शकतात. त्या आधी आम्हा सर्व शेतकरी व इतर नागरिकांना योग्य मोबदला मिळावा. मोबदला न मिळाल्यास महाराष्ट्र दिनी सर्व शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...