आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत यांच्या वक्तव्याला सुमित्रा महाजनांचे समर्थन;स्वयंसेवकांना सीमेवर पाठवण्याचे केले होते वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ दिवसांत स्वयंसेवक तयार करून सीमेवर लढण्यासाठी पाठवू शकतो, या सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शनिवारी समर्थन केले. युद्धाची वेळ आल्यास आम्हीही भारतीय लष्कराच्या मदतीला आहोत, हेच सांगण्याचा वक्तव्यामागील हेतू होता. मात्र, ते चुकीच्या पद्धतीने मांडण्याचे प्रयत्न झाले, असे सरसंघचालकांचे नाव न घेता महाजन म्हणाल्या. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी माध्यमांनाही कानपिचक्या देत त्या म्हणाल्या, एखाद्या संघटनेच्या कृतीकडे कायम वाकड्या नजरेनेच बघण्याची वृत्ती आज दिसून येते. स्वातंत्र्यासाठी तुम्ही काय केले, असा अर्थहीन आक्षेप अनेक संघटनांवर घेतला जातो, असा मुद्दा संघाचे नाव न घेता उपस्थित करून महाजन म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक जण नव्हते. मीदेखील नव्हते. मग या आक्षेपाला काय अर्थ उरतो?

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...