आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सुप्रिया सुळे. - Divya Marathi
खासदार सुप्रिया सुळे.

नागपूर/अकोला- राज्यातील  जनतेला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रेने नवव्या दिवशी खडकी गावातून प्रयाण केले. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी GST, नोटाबंदी, कर्जमाफी याविषयांवर सरकारवर हल्लाबोल केला. जनतेनेही सरकारला जाब विचारण्यासाठी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. या सभेनंतर हल्लाबोल पदयात्रेने नागपूरमध्ये प्रवेश केला आहे. पदयात्रेचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी स्वागत केले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...