आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील विविध दलममध्ये कार्यरत दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. जया ऊर्फ शांती मासू मट्टामी व रनिता ऊर्फ सुनीता नामदेव कोडापे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया ऊर्फ शांती मासू मट्टामी (२४) ही डिसेंबर २०१२ पर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. त्यानंतर मे २०१३ मध्ये तिची बदली प्लाटून क्रमांक १४ मध्ये करण्यात आली. ६ डिसेंबर २०१७ रोजी ती पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक झाल्यानंतर वरिष्ठ नक्षल्यांच्या उपस्थितीत तोंडेर जंगलात बैठक घेण्यात आली. यात जयाची नियुक्ती प्लाटून क्रमांक १४ च्या उपकमांडरपदी करण्याची घोषणा करण्यात आली. जयावर खुनाचे ११ गुन्हे, जाळपोळीचे ६, नैनेर येथील चकमक(२०१४) बेजूरपल्ली चकमक (२०१३), नैनगुडा फाट्यावरील चकमक (२०१४) व दोडगीर चकमक (२०१४) अशा १२ चकमकींसह २९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्या अटकेसाठी ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
रनिता ऊर्फ सुनीता नामदेव कोडापे (१८) ही डिसेंबर २०१३ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य होती. फेब्रुवारी २०१६ पासून तिची बदली सिरोंचा दलममध्ये करण्यात आली. तिच्यावर खुनाचे ८ गुन्हे, जाळपोळीचे ४, तसेच गुरजा जंगलातील चकमक (२०१४), नैनगुडा चकमक (२०१४), कल्लेड चकमक (२०१७) अशा ११ पोलिस चकमकींसह २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.