आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्‍तीसाठी पाच वर्षीय भावाचा खून; 5 महिन्‍यांनी गुन्‍हा उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - लहान भाऊ जमिनीच्या हिश्यात वाटेकरी होऊ व भविष्यात तो डोईजड होईल, अशी सांगत सासूने कान भरले. यामुळे सख्खा भाऊ आणि वहिनीने पाच वर्षीय भावाचा िनर्घृण हत्या केली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना गतवर्षी तालुक्यातील भिंगाण येथे घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत शांतीलाल पाखरे, काजल पाखरे व संगीता तांबे (शांतीलालची सासू) यांना अटक केली आहे. 


वडील बापू पारखे यांच्या फिर्यादीवरून १३ सप्टेंबर २०१७ रोजी बाल्या बापू पारखे (५) या बालकाचा अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र पोलिस तपासात या िचमुकल्याचा त्याच्याच भावाने व वहिनीने संपत्तीसाठी खून केल्याचे सिद्ध झाले. श्रीगोंदे तालुक्यातील भिंगाण येथील बापू पाखरे हे कुटंबासह राहतात. त्यांना २५ वर्षीय शांतीलाल हा मुलगा आहे. त्याचे लग्न झाले आहे. बापू पाखरे यांना २० वर्षांनंतर बाल्या नावाचा मुलगा झाला. हा मुलगा बापू पाखरेचा मुलगा असल्याने तो ही वारस अाहे. त्याला ही संपत्तीत वाटा मिळू शकतो. म्हणून शांतीलालच्या सासूने ५ वर्षीय बाल्याचा काटा काढण्यास जावई शांतीलाल व मुलगी काजल हिला सांगितले त्यानुसार १३ सप्टेंबर २०१७  रोजी  शांतीलालने व त्याची पत्नी काजल हिने  दुपारी २ वाजेच्या सुमारास पाच वर्षीय बाल्या घरात झोपला असता त्याचे हातपाय बांधून कुऱ्हाडीने अंगावर वार करून ठार केले.नंतर मृतदेह कपड्यात गुंडाळून घराच्या परिसरात फेकून दिले. आई भोळसर असल्यामुळे तिने इकडे तिकडे पाहिले. पण बाल्याचा शोध लागला नाही. अखेर वडील बापू पाखरे यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आठ ते दहा दिवसांनी मुलाच्या आईला घराशेजारील काटवनामध्ये मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर जखम होती. याची मािहती त्यांनी पाेलिसांना दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता.

 

पुरावा केला नष्ट
एक महिना अगोदरच अाराेपीने खून करण्याचा कट रचला हाेता. साेमवारी श्रीगोंदेचा आठवडे बाजार असल्याने गावात वर्दळ कमी असते. दुपारी ट्रॅक्टर कारखान्यावर लावून अाराेपी घरी आला. लहान भाऊ बाल्याचा खून केला. आरोपीची पत्नी काजल हिने बाल्याचा मृतदेह काटवनात नेऊन टाकला व त्यावर  गोधड्या टाकल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...