आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात 'सीटू'च्या नेतृत्वात मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - औषध कंपन्यांकडून होणारे शोषण आणि शासनाच्या विरोधात एमएसएमआरएच्या जिल्ह्यातील शेकडो विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांनी गुरुवार, दि. ७ जून रोजी सीटूच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. इर्विन चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून दुचाकीवर विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचा निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ च्या सुमारास धडकला. 

 

महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी (एमएसएमआरए) ही औषधे क्षेत्रात काम करणाऱ्या विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत कामगार संघटना असून त्यांच्या शोषणाविरुद्ध औषध कंपन्यांविरोधात तसेच कायदेशीर हक्क जपण्यासाठी लढा देत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करताना राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढील आठ दिवसांत आपल्या मागण्यांसाठी बैठक बोलावू, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही बैठक बोलावण्यात आली नाही. सरकारच्या या उदासीनतेचा औषध कंपन्या फायदा घेत अनेक कंपन्यांचे व्यवस्थापक पैसे मागत आहेत. अलकेम कंपनीतील एरिया बिझनेस व्यवस्थापकाने कंपनीच्या मुंबई येथील विक्री संवर्धन कर्मचाऱ्याला महिन्याच्या औषध विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. 

 

७ जूनच्या संपाद्वारे एमएसएमआरए राज्य सरकारकडे घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी पैसे मागणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष व आंदोलनाची भुमिका घेतली आहे. औषध क्षेत्रात काम करीत असलेल्या विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांच्या मनपा क्षेत्रातील सर्वसाधारण कामकाजाच्या वेळा सलग करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...