आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- देशभरात बंदी असलेल्या तणनाशक सहनशील (हर्बिसाइड टॉलरंट) बियाण्यांचा महाराष्ट्रात शिरकाव कसा झाला, या बियाण्यांचे उत्पादन कोण करते व शेतकऱ्यांना अवैधपणे ते कुणी-कसे उपलब्ध करून दिले याचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने ‘एसआयडी’चे (राज्य गुप्तचर विभाग) आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वात नवी एसआयटी स्थापली आहे. असे बियाणे निर्माण करणाऱ्या ३ कंपन्या एसआयटीच्या चौकशीच्या रडारवर आहेत.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, विदर्भात फवारणी मृत्यूच्या घटनांत अशा बियाण्यांचा प्रसार झाल्याचे समोर आले. चौकशी करून एसआयटी महिनाभरात अहवाल सादर करेल.
केंद्राकडूनही गंभीर दखल
केंद्राने गेल्या वर्षी अशा बीटी वाणांचा अनधिकृत प्रसार रोखण्यासाठी डॉ. के. वेलुथंबी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. देशातील बहुतेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये या बियाण्यांचा अनधिकृतरीत्या प्रसार झाल्याचे आढळून आले आहे.
यांचा आहे समावेश
महिको मोन्सॅटो बायोटेक प्रा.लि., मोन्सॅटो होल्डिंग्ज प्रा. लि. व मोन्सॅटो इंडिया लि. कंपन्यांकडून निर्मित एचटी बियाण्यांची विक्री, साठवणुकीची चौकशी एसआयटी करेल. दोषींवर कारवाई; अशा घटनांवर उपाययोजनेच्या शिफारशी या उच्चस्तरीय एसआयटीला कराव्या लागणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.