आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- लोकलमध्ये नक्षलवाद्यांना श्रध्दांजली अर्पण करणारे संदेश, लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील महिन्यात सुरक्षा दलाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांत कारवाई करत 30 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले होते. या कारवाईचे देशभरातून स्वागत करण्यात आले होते मात्र मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांनी श्रद्धांजली अर्पित करणारे संदेश लिहिलेले आढळले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

 

दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री अकराच्या सुमारास पनवेलला लोकल ट्रेन  सुटली होती. या ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात नक्षलवाद्यांना श्रध्दांजली अर्पण मजकूर लिहिण्यात आला होता. ‘रेल सॅल्यूट्स टू दि गडचिरोली मार्टियर्स’ असा संदेश लोकलच्या डब्यात मार्करने लिहीला होता. त्याच्या शेजारीच ‘लाँग लिव्ह द रेव्होल्युशन’ असेही लिहिण्यात आले होते. तसेच नक्षलवादी संघटनेची चिन्हेही काढण्यात आली. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास येताच त्याविरोधात प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रारही केल्या आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तक्रार प्राप्त झाली असून अधिक तपास सुरू केल्याची माहिती दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...