आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: ४८९ मतदार करणार आज दाेन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या सोमवार २१ मे राेजी होऊ घातलेल्या निवडणुकीत ४८९ मतदार दोन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद करणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगढीया यांच्यात सरळ लढत होणार असून जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. 


सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर होणार आहे. तहसील कार्यालय स्तरावर एकूण १४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदार यादीत महापालिकेचे ९२ सदस्य, जिल्हा परिषदेचे ५९ सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती १४, नगर परिषद २४९ सदस्य, नगरपंचायत ७५ असे एकूण ४८९ सदस्य आहेत. मतदारांना पसंती क्रमाने मतदान करावयाचे आहे. मतदारांनी मतदान केंद्रात मतदानासाठी प्रवेश करताना निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र किंवा स्थानिक प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. मतदारांना मतदान करताना निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर दिलेले जांभळ्या रंगाचे स्केचपेनच वापरावे लागणार आहे. अन्य साधन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरेल. 

 

उमेदवारांना पसंतीक्रम केवळ आकड्यातच लिहावा लागणार आहे. धारणी तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, चिखलदरा तालुक्यात तहसीलदार यांचा कक्ष, अंजनगाव सुर्जीत तहसील कार्यालयाचे नवीन सभागृह, अचलपूरात तहसीलदार यांचा कक्ष, दर्यापूरात तहसीलदारांचे सभागृह, चांदूरबाजारात तहसील कार्यालयाचे सभागृह, भातकुलीत तहसील कार्यालयाची निवडणूक शाखा, मोर्शीत तहसील कार्यालय सभागृह, अमरावतीत तहसील कार्यालयातील बचत भवन, वरुडात तहसीलदार यांचा कक्ष, नांदगाव खंडेश्वरात तहसील कार्यालयाचे सभागृह, तिवस्यात तहसीलदारांचा कक्ष, चांदूर रेल्वेत तहसील कार्यालयाचे सभागृह, धामणगाव रेल्वेत तहसील कार्यालयाचे सभागृह आदी मतदान केंद्र राहणार आहे.