आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: नक्षल्यांशी लढताना शहीद झालेल्या पाेलिसाची पत्नी उपशिक्षणाधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- लष्करात असलेल्या पतीला वीरमरण आल्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिकच्या जिद्द आणि चिकाटीची महती संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत नक्षल्यांशी लढताना पती गमावणाऱ्या एका वीरपत्नीने अत्यंत मेहनतीने तयारी करत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे. हेमलता जुरू परसा असे या उपजिल्हाधिकारी बनलेल्या वीर पत्नीचे नाव आहे.


हेमलता आणि जुरू दोघेही गोंड-माडिया आदिवासी. गडचिराेली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरू केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताचीच. बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदवी पास झाल्यानंतर जुरू पाेलिसात भरती झाला. पत्नी शिक्षिका हाेती. लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षल्यांशी लढताना जुरू शहीद झाला. त्यानंतर  हेमलताने दुसरे लग्न न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले व स्पर्धा परीक्षा देऊन हे यश मिळवले.


जिद्दीला यशाचे कोंदण 
पतीच्या निधनानंतर हेमलता यांना पोलिस विभागाने मदतीचा हात पुढे केला. २०१५ मध्ये त्या गटशिक्षणाधिकारी झाल्या. जिद्द आणि चिकाटी कायम होती. पतीच्या आठवणी आणि उंच भरारी घेण्याच्या स्वप्नाने त्यांना पुन्हा बळ दिले. शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नुकताच १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलता यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी हेमलता यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...