आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष देवून विवाहित युवकाकडून उकळले ८ लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहित युवकाची दोन वर्षापूर्वी नंदुरबारच्या एका युवतीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघेही अनेकदा सोबत फिरले. याच दरम्यान युवतीने युवकाला लग्न करण्याचे आमिष दाखवून विवीध कारण सांगून जवळपास आठ लाख रुपये उकळल्याची तक्रार युवकाने शनिवारी (दि. २६) रात्री फ्रेजरपुरा पोलिसात   दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी युवतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील प्रशांत नगरमध्ये राहणारे सागर रमेशराव गाडे असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. सागर यांचा डी. जे.चा व्यवसाय आहेे. सागरचा मावसभाऊ नरेन्द्र दिपक जाधव हे मुंबईत राहतात. दोन वर्षांपुर्वी नंदूरबार जिल्ह्यात राहणारी एक युवती त्याच्यासोबत सागर यांच्या घरी आली होती. त्यावेळी ती युवती तीन दिवस सागरच्या घरी होती. यातूनच त्यांची दोघांची ओळख झाली. दरम्यान सागरचे त्याच्या पत्नीसोबत फारसे पटत नव्हते. याच संधीचा फायदा घेवून त्या युवतीने सागरला मैत्रीत ओढले. त्यानंतर तीने सागरला आपण लग्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, तिने भावाचा प्रवेश करणे तसेच फार्मसीचे लायसन काढून औषधींचे दुकान सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये घेतले. असे सागर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सागरने लग्नाबाबत युवतीला म्हटले असता तिने आपले लग्न पूर्वीच झाले असल्याचे सांगितले तसेच सागर यांच्याकडून घेतलेले पैसेही परत दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याप्रकरणी सागरने फ्रेजरपुरा पोलिसात शनिवारी तक्रार दिली. पोलिसांनी त्या युवतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...