आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: दारूबंदीसाठी नवरगाव येथील महिलांची जिल्हा कचेरीवर धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- सरकारमान्य दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील शेकडो महिलांनी आज, दि. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे गावाच्या सुरुवातीलाच सरकार मान्य देशी दारुचे दुकान आहे. या दुकाना समोरुनच शाळेतील विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्यापुढेच श्रीकृष्ण तुळशी देवस्थान आहे. या देवस्थानाला नुकताच क तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर झालेला आहे. 


पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. मात्र, या परिसरात असलेल्या दारूच्या दुकानामुळे अनेकदा विद्यार्थी व भाविकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या दारूच्या दुकानामुळे गावात व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामूळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. म्हणून हे दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी गावातील महिलांकडून केली जात आहे. या मागणीसाठीच गावातील शेकडो महिलांनी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक दिली. यावेळी त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांना निवेदन दिले. यावेळी नवरगावच्या सरपंच सुनिता सोनुले, मिना शेंडे, सुलोचना लोणबले, माया धंदरे, भारती सातपुते, दुर्गा मोहुर्ले, शकुंतला काटकर, वनमाला फुलझेले, रेखा गाऊत्रे, आशिया पठाण, अंजली नक्षणे आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...