आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवाहू ऑटोचे हायवेवर झाले दोन तुकडे; 1 ठार, आठ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीकडून नांदुऱ्याच्या दिशेने भाविकांना नेणाऱ्या मालवाहू ऑटोचे दोन तुकडे झाले. यामुळे भाविकांचा ऑटोचा मागील भाग तुटून रस्त्यावर कोसळला तर चालकाचे केबिन रस्त्याच्या कडेला जावून पडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदगाव पेठजवळ बुधवारी २१ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला.

 

दीपक पवार ४० (रा. वेलेगाव जि. वाशीम) असे मृताचे नाव असून विमल देविदास राठोड (४०) या गंभीर जखमी आहेत. याचवेळी शालू राजू चव्हाण(४०), नलिनी पवार (३५), अंबादास राठोड (६५), नेहा राठोड (२०), राजू चव्हाण (४०), अंश चव्हाण (४)आणि परिती चव्हाण (५) असे जखमींचे नावे आहेत. जखमी मांजरी म्हसला व वेलेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती. हे भाविक बुधवारी रात्री मालवाहू टाटा एस वाहनाने अमरावतीकडून मोर्शी परिसरातील नांदुरा येथे यात्रेसाठी जात होते. नांदगाव पेठनजीक टोल बूथ पार करून हे मालवाहू वाहन नांदगाव पेठच्या दिशेने एक किलोमीटर पुढे आले असता वाहनाचे केबिन व भाविक असलेला मागील भाग (ट्रॉली) वेगवेगळा झाला. यामुळे केबिन रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाली तर भाविकांची ट्रॉली रस्त्यावर आदळली. यामुळे मागे बसलेल्यांना मार बसला व एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना इर्विनमध्ये दाखल केले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती, मात्र माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार कैलास पुंडकर पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी क्रेनच्या मदतीने तुटलेला मालवाहू ऑटोचा भाग रस्त्याच्या कडेला घेवून वाहतूक सुरळीत केली. या वेळी एकाने दारु पिवून घटनास्थळी गोंधळ घातला, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटकाव केला तर त्याने पोलिसांसोबत हुज्जत केली.

 

पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
तुटलेले वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी पोलिसांनी क्रेन बोलावली. त्यावेळी एकाने क्रेनवरील कामगारांसोबत वाद घातला. म्हणून पोलिसांनी त्या व्यक्तीला हटकले तर त्याने पोलिसांच्या अंगावर धाव घेतली, त्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतले. अशी माहिती ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी दिली आहे.

 

नांदगाव पेठजवळ झाला विचित्र अपघात, पोलिसांशी एकाने घातली हुज्जत
अपघातात मालवाहू वाहनाचे असे दोन तुकडे झाले होते. त्याची ट्रॉली रस्त्यावर होती तर केबिन रस्त्याच्या कडेला जाऊन पडले होते.

 

बातम्या आणखी आहेत...