आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अल्पवयीन मुलींना फुस लावून नेले पळवून, घटनांमध्‍ये दिवसेंदिवस वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या सातत्याने घडत असून यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान आणखी दोन सतरा वर्षीय मुलींना फुस लावून पळवून नेल्याच्या घटना नांदगाव खंडेश्वर व बेनोडा पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आल्या आहेत.

 

सातरगाव (ता. नां. खं.) येथील सतरा वर्षीय मुलगी बुधवारी (दि. ७) स्कॉलरशिप आणायला जाते म्हणून घरून निघून गेली. परंतु ती परत आली नाही. दरम्यान सदर मुलीकडे घरासमोर राहणाऱ्या योगीराज नारायण पेठकर रा. सातरगाव याचे येणेजाणे होते. योगीराज मुलीसोबत मोबाइलवर बोलायचा. याबाबत मुलीचे पालक तिच्यावर संतापले होते.


दरम्यान बुधवारपासून मुलगी घरी परत आली नाही. त्याच दिवसापासून योगीराजही घरी आला नाही. त्यामुळे मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून योगीराज पेठकर याच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून योगीराजवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत बेनोडा येथील सतरा वर्षीय मुलगी शुक्रवारी (दि. ९) बारावीचा पेपर देण्यासाठी सकाळी दहा वाजता घरून निघून गेली. परंतु ती अद्यापपर्यंत घरी परत आली नाही. तिचा गावात व नातेवाईंकाकडेही शोध घेतला परंतु ती सापडली नाही. दरम्यान दोन वर्षांपूर्वी बेनोडा येथील अनिल गुलाबराव कोकाटे याने तिला प्रेमप्रकरणातून पळवून नेले होते. त्यामुळेच त्यानेच मुलीला पळवले असल्याचा संशय व्यक्त करून त्याच्याविरुद्ध बेनोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून शुक्रवारी बेनोडा पोलिस ठाण्यात अनिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...