आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेल ओतून तिघा शेतकरी भावंडांचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - ऊस वाहतुकीसाठी रस्ता देण्यात यावा असा आदेश तहसील कार्यालयातून पारीत झाला आहे. असे असतानाही गैरअर्जदार शेतकऱ्यांनी अडवणूक केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी तीन सख्ख्या भावंडांनी आज, दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दरम्यान उमरखेड पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी तत्परता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तब्बल १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

 

तालुक्यातील चुरमुरा येथील शेतकरी प्रवीण रामजी पवार, दीपक रामजी पवार, राहूल रामजी पवार हे तिघेही सख्येभाऊ हातात रॉकेलचा डब्बा घेऊन दुपारच्या सुमारास अचानकपणे पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचले. काही कळण्याअगोदरच अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करित होते. अशात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रवीण पवार व त्यांच्या भावांचे शेतीत ऊसाचे पीक आहे. मात्र, त्यांना ऊस वाहतूकीसाठी रस्ता नाही. बऱ्याचवेळा त्यांनी प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली. त्या अनुषंगाने दि. ३० जानेवारी २०१८ रोजी ऊस वाहतूकीसाठी रस्ता देण्यात यावा, असा आदेश तहसील कार्यालयाने दिला होता. मात्र, आज, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रस्त्याचा मार्ग काढीत असतांना गैरअर्जदार शेतकरी मारोती पवार, उत्तम पवार, देवराव पवार, भिमराव तुकाराम पवार, नारायण पवार, लक्ष्मण पवार, किशोर पवार, रितेश पवार, शुभम पवार, अक्षय पवार, राजेश पवार यांनी अडवणूक करून प्रवीण पवार व त्यांच्या भावांना मारहाण केल्याची तक्रार झाली. त्यावरून पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल केले. तर नारायण पवार यांच्या तक्रारीवरुन दीपक रामजी पवार, प्रवीण रामजी पवार, राहूल रामजी पवार, महेश रामजी पवार, ड्रायव्हर दत्ता पुंजाराम काटे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...