आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : मेळघाटातील सेमाडोहमध्ये अग्नीतांडव, 50 घरे जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथे सोमवारी दुपारी कच-याच्या ढिगाला लागलेली आग जवळील घरांत पसरल्याने या आगीत 50 घरे जळून खाक झाली आहेत.  यामुळे 60 कुटूंबे बेघर झाली आहेत.  अग्निशमक दलाने ही भीषण आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले 

 

या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नेमकी ही आग कशी लागली हेदेखील समजलेले नाही. परिसरात आगीचे व धुराटे लोट मोठ्या प्रमाणात पसरल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. या घटनेची माहिती मिळताच अचलपूरहून  अग्निशमक दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले गेले. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. कपडे घरगुती वापराच्या वस्तू, अन्नधान्य संपूर्ण संसार उद्धवस्त  झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...