आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांच्या 30 जागांसाठी 3700 अर्ज, 6 फेब्रुवारीपासून अर्ज करण्‍याच्‍या प्रक्रियेस सुरूवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पोलिस भरतीसाठी ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहर पोलिस दलात यंदा ३० जागांसाठी भरती होणार आहे. या ३० जागांसाठी २४ फेब्रुवारीपर्यंत तब्बल ३ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले. अाणखी तीन दिवस (२८ फेब्रुवारी)पर्यंत अर्ज करता येणार असल्यामुळे येणाऱ्या अर्जांची संख्या सहा हजारांवर जाण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

शहर पोलिस दलासोबतच ग्रामीण व एसआरपीएफसाठीही भरती होणार आहे. शहर पोलिसांच्या ३० जागांमध्ये १७ जागा इतर मागासवर्गीय, महिलांसाठी नऊ, खुला प्रवर्ग एक, तसेच गृहरक्षक दल, पोलिस पाल्य, प्रकल्पग्रस्तांसाठी जागा आरक्षित आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंत महिलांच्या नऊ जागांसाठी ६२१, तर पुरुषांचे ३ हजार १७५ असे एकूण ३ हजार ७९६ अर्ज प्राप्त झाले आहेत. आणखी तीन दिवस उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्जांची संख्या किमान सहा हजारांवर पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान, ७ मार्चपासून प्रत्यक्षात उमेदवारांच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे. उमेदवारांचे अर्ज तपासणी तसेच मैदानी चाचणी होईल. त्यानंतर मैदानी चाचणीतून लेखीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल व त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होणार आहे. दरम्यान, ९ व १० फेब्रुवारीला ही प्रक्रिया बंद राहणार आहे. १० फेब्रुवारीला मुख्यमंत्री व अन्य 'व्हीव्हीआयपी' शहरात येणार आहे. या वेळी शहर पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त राहणार असल्याने दोन दिवस भरती प्रक्रिया थांबवून ११ फेब्रुवारीपासून नियमितपणे सुरू करणार असल्याचे पोलिस उपायुक्त (प्रशासन) प्रदीप चव्हाण यांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...