आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात 45 सायबर पोलिस ठाणी सुरू होणार; हजार कोटींचा खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सायबर गुन्हेगारीचे वाढते आव्हान लक्षात घेऊन राज्यात तब्बल ४५ सायबर पोलिस ठाणी सुरू होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सायबर प्रयोगशाळांनाच पोलिस ठाण्यांचे स्वरूप दिले जाणार असून एक हजार कोटी रुपये खर्च करून राज्यात सायबर सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार आहे.    


गेल्या वर्षी शासनाने राज्यात ४२ सायबर प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. आता या  प्रयोगशाळांनाच सायबर पोलिस ठाण्याचे स्वरूप दिले जाणार आहे. एकूण ४४ सायबर पोलिस ठाणी राज्यात सुरू होणार असून ३७ सायबर प्रयोगशाळांना ठाण्याचे स्वरूप देण्याचे कामही पूर्णत्वाला आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  या ठाण्यांकडे सायबर गुन्हे आणि धोके हाताळण्याची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी दीडशेवर कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हेगारी हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  राज्य शासनाच्या वतीने महत्त्वाकांक्षी सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सर्ट) या प्रकल्पावर काम सुरू आहे. केंद्राच्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या एमएच सर्ट यंत्रणेच्या माध्यमातून सायबर हल्ले तसेच कुठल्याही स्वरूपाच्या बेकायदेशीर सायबर कारवायांचा सामना करणे शक्य होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...