आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोलीत अाणखी 6 नक्षलींचा खात्मा; 24 तासांत 22 नक्षली टिपले, कमांडर नंदूही ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिराेली जिल्ह्यातील राजाराम खांंदला (ता. अहेरी) येथील जंगलात सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत अहेरी दलम कमांडर नंदू याच्यासह आणखी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यापूर्वी रविवारी भामरागडच्या जंगलात २ कमांडरसह १६ नक्षलींना टिपण्यात अाले हाेते. त्याच्या २४ तासांतच ही कारवाई झाली.


पोलिसांचे सी ६० पथक साेमवारी जंगलात गस्त घालत असताना त्यांच्यावर नक्षलींनी गोळीबार केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत ६ नक्षलवादी ठार झाले. मृतात नक्षलींच्या अहेरी दलम कमांडर नंदू याचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी या कारवाईला दुजाेरा दिला असला तरी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

 

नदीत सापडले मृतदेह?
इंद्रावती नदीत काही मृतदेह सापडल्याची चर्चा आहे.रविवारी चकमकीतील नक्षलींचे मृतदेह असण्याची शक्यता अाहे. तसे झाल्यास मृत नक्षलींची संख्या अाणखी वाढू शकते. मात्र याबाबत अधिकृत दुजाेरा देण्यास आयजी शेलार यांनी नकार दिला.  

बातम्या आणखी आहेत...