आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 कोंबड्यांवर 600 कोटींचे कर्ज, गुट्टे हे 'छोटा नीरव मोदी'; धनंजय मुडेंचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेतकऱ्यांच्या नावे खोटी कर्जे घेऊन ७ हजार कोटींचा घोटाळा करणारे गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे 'छोटा नीरव मोदी' आहेत. ३०० कोंबड्या असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर त्यांना बँकांनी ६०० कोटींचे कर्ज दिले. तब्बल २७ हजार शेतकऱ्यांच्या नावे गुट्टेंनी खोटे कर्ज उचलले. याबाबत गुन्हे दाखल होऊनही अटक न करता सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.

 

कर्ज देणाऱ्या बँकांची यादी मुंडेंनी सभापतींकडे सादर केली. दरम्यान, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून, तारण मालमत्ता अन्य बँकांत फिरवून बँकिंग व्यवस्था खिळखिळी करण्याची ही पद्धत अत्यंत गंभीर असून सरकारने त्वरित कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.

 

२०१७ च्या पावसाळी अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु गुट्टेंना अद्याप अटक झाली नाही. डीएसके यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा न मिळाल्याने तक्रारदारांच्या तक्रारींवरून डी. एस. कुलकर्णींच्या संपूर्ण कुटुंबास अटक होते. मात्र, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावे खोटे कर्ज घेणाऱ्या, बनावट कंपन्या स्थापन करून ७ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या गुट्टेंबाबत सत्ताधारी पक्षाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही मुंडेंनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...