आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा-परिषदेचे प्रत्‍येकी 8 तास वाया, सरकारचे साडेसात कोटी पाण्‍यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर येथील पावसाळी अधिवेशनचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस होता. आठवडाभर चालेलेल्‍या या अधिवेशनात कधी सत्‍ताधारी-विरोधकांच्‍या गोंधळामुळे, तर कधी जोरदार पावसामुळे सभागृहात पाणी साचल्‍यामुळे अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. याचा फटका अर्थात जनसामान्‍यांकडून भरण्‍यात आलेल्‍या सरकारी तिजोरीला बसलेला आहे.

 

यंदाच्‍या पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे 8 तास 19 मिनिटे कामकाज वाया गेले तर विधान परिषदेचे 8 तास 27 मनिटे वाया गेले. सभागृहाचे कामकाज चालवण्‍यासाठी प्रत्‍येक मिनिटासाठी 70 हजार रुपये खर्च होतात. त्‍या हिशोबाने यंदाच्‍या विधानसभेसाठी जो खर्च करण्‍यात आला त्‍यापैकी 3 कोटी 49 लाख 30 हजार रुपये पाण्‍यात गेले आहेत तर विधानपरिषदेसाठीचे 3 कोटी 54 लाख 90 हजार व्‍यर्थ खर्च झाले आहेत. म्‍हणजेच दोन्‍ही सभागृह चालवण्‍यासाठी जो खर्च करण्‍यात आला त्‍यापैकी ऐकूण 7 कोटी 4 लाख 20 हजार रुपये अक्षरश: पाण्‍यात गेले आहेत. यापुर्वीच्‍या मार्च 2018च्या अधिवेशनामध्ये विधानसभेची 10 तास 51 मिनिटे आणि विधानपरिषदेची 16 तास 23 मिनिटे वाया गेली होती.

 

मागील अधिवेशनांमध्‍ये वाया गेली ऐवढी तासं
- 2017 सालच्या पावसाळी अधिवेशनमध्ये विधानसभा 10 तास 53 मिनिटे आणि विधानपरिषदची 23 तास 83 मिनिटे वाया गेली.
- मार्च 2017 मध्ये विधानसभा 13 तास 59 मिनिटे आणि विधानपरिषद 17 तास 28 मिनिटे चाललीच नाही.  
- तर 2016 सालच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे 6 तास 45 मिनिटे आणि विधानपरिषदचे 3 तास 10 मिनिटे कामकाज झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...