आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: अवैध दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - दारू बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा करण्यासाठी पांढरकवडा, कारंजासह अन्य शहरे आघाडीवर असल्याचे बोलल्या जात असतांना वणी हे दारू तस्करीचे केंद्र बनले आहे. मात्र यावर स्थानिक अंकुश लावण्यास पोलिस यंत्रणा कारवाई अपयशी ठरत असल्याने अखेर आज, दिनांक ७ जुलैला स्थानिक गुन्हे शाखेने लालगुडा परिसरात मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल सात लाखाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

 

शहरात अवैध व्यवसायांनी चांगलेच डोके वर काढले असतांना दारू तस्करांचे दारू बंदी असलेला चंद्रपूर जिल्हात चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. दारू शौकिनांचे चोचले पुरविण्यासाठी वणी तालुक्यातून वरोरा तसेच घुग्गूस मार्गाने चंद्रपूर शहरात अवैध दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात असल्याच्या घटना नेहमीच समोर येत आहे. हे सत्र मागील अनेक दिवसांपासून अविरत सुरू असतांना स्थानिक पोलिस विभागाकडून दारूच्या तस्करीला खुलेआम मिळणारे अभय सर्वश्रृत आहे. वर्षभरात तस्करांवर अनेकदा कारवाई झाली. मात्र, अद्याप यामागील मुख्य सूत्रधार पोलिसांना गवसल्याचे ऐकिवात नाही. अखेर या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार स्थानिक गुन्हे शाखेने घेतला आहे.

 

शहरालगत असलेल्या लालगुडा परिसरात एका बारमधून दारू पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून नियोजित सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच-३४-एबी-८६४६ या वाहनातून १९ बॉक्स देशी दारू तर एमएच-२९-एल-३८८ या इंडिका वाहनातून २५ हजार रुपये किंमतीची विदेशी दारूसह एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमोल तेलंग, विजय राठोड, प्रणय वाढई या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पथकातील सहायक फौजदार भीमराव शिरसाट, गजानन डोंगरे, महेश पांडे, किशोर भेंडेकर यांनी यशस्वी केली. या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

 

एलसीबी पथक दाखल होताच वणी पोलिस अलर्ट
शहरात अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पथक दाखल होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची चमू अचानक अलर्ट झाले. आणि कारवाईचा आव आणत शहरातील दामले फैल परिसरातून एमएच-२९-वि-९३७६ या इंडिगो वाहनातून घोन्सा मार्गावर ४५ हजार रुपये किमतीची परजिल्ह्यात जाणारी देशी दारू आणि चारचाकी वाहन असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

बातम्या आणखी आहेत...