आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍नेहसंमेलनात दुध पिल्‍याने 90 विद्यार्थांना विषबाधा; भंडारा जिल्‍ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा- स्‍नेहसंमेलाना दरम्‍यान दुध‍ पिल्‍यामुळे 90 विद्यार्थांना विषबाधा झाली आहे. भंडारा जिल्‍ह्यातील सुकळी गावातील ही घटना असुन विद्यार्थांना उपचारासाठी उपजिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 
 
भंडारा जिल्‍ह्यातील साकोली तालूक्यातील सुकळी गावा मधील शाळेत गणतंत्र दिना निमित्‍त स्‍नेह संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍नेहसंमेलन दरम्‍याने शाळेतील 100 विद्यार्थांना पिण्‍यासाठी दुध देण्‍यात आले. दुध पिल्‍यानंतर काही वेळाने या विद्यार्थांना उलटीचा त्रास सुरू झाला. नागरीकांनी तात्‍काळ याची माहिती रुग्‍णालयाला कळवली. यानंतर त्रास होत असलेल्‍या 90 विद्यार्थांना रुग्‍णवाहीकेद्वारे उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. विद्यार्थांवर उपचार सुरू असून दुध तसेच पाण्‍याचे नमुने तपासनी करीता पाठवण्‍यात आले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...