आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- येथील लाजपतराय नगरमधून बेपत्ता झालेल्या एका मुलीचा मृतदेह वैनगंगा नदीत सापडला आहे. 13 जानेवारी रोजी ही 22 वर्षीय तरुणी ट्यूशनसाठी घरातून निघाली होती. पण रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली होती. पोलिसही मागील 4 दिवसांपासून तिचा शोध घेत होते.
काय आहे पूर्ण प्रकरण
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाजपतराय वॉर्डात राहणाऱ्या प्रतिक्षा बागडे (वय 22) ही 13 जानेवारी रोजी ट्यूशनसाठी घरातून बाहेर गेली होती. रात्री दहा वाजल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरु केला. तिचा मोबाईलही यावेळी लागत नव्हता.
- बऱ्याच काळानंतर त्यांचा कॉल रिसिव्ह करण्यात आला. पण हा कॉल तिच्या मित्राने उचलला आणि कॉल कट केला. प्रतीक्षा सकाळीही घरी आली नाही. त्यामुळे घरच्यांनी अखेर पोलिसांकडे फिर्याद दिली.
मित्रावर खून केल्याचा संशय
- प्रतीक्षाच्या घरच्यांनी फिर्याद दिल्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह नदीत सापडला.
- प्रतीक्षाच्या शरिरावर जखमा असून तोंडातून रक्त वाहत होते. पोलिसांनी तिच्या मित्र आणि मैत्रिणीवर याबाबत संशय व्यक्त केला आहे.
- पोलिस याप्रकरणी तिचा मित्र सागर गजभिये याची चौकशी करत आहेत. प्रतीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.