आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: दंडकारण्य बंदच्या दरम्यान पोलिसांशी चकमकीत एक नक्षलवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर: नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य बंदच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. ठार झालेल्या नक्षल्यावाद्याची ओळख आद्याप पटू शकलेली नाही. 

 

एटापल्ली उपविभागात मुरेवडा जंगलात सोमवारी दुपारी सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यानी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पथकाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कार्यवाईत  या नक्षलवाद्याचा घत्मा झाला आहे.


चकमकस्थळावर एक 8 एमएम रायफल व अन्य साहित्य सापडले आहे. मृत नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नलवादी संघटनांनी सोमवारी दंडकारण्य बंदची घोषणा दिली होती. त्यामुळे जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...