आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस क्वॉर्टर छतावरून उडी मारून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- चंद्रपूर येथून यवतमाळला चुलत भावाच्या विवाह समारंभासाठी आलेल्या एका २९ वर्षीय तरूणाने पोलिस वसाहतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सचिन प्रकाश चांदेकर वय २९ वर्ष रा. एकोरीपोड, चंद्रपूर असे मृत तरूणाचे नाव आहे. 


चंद्रपूर येथील अशोक चांदेकर यांच्या मुलाचा यवतमाळ येथे गुरूदेव मंगल कार्यालयात शुक्रवारी विवाह होता. यावेळी संपूर्ण चांदेकर कुटूंब या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. अशातच लग्नप्रसंगी चंद्रपूर येथून आपल्या पत्नी व दोन मुलांसह आलेल्या सचिन चांदेकर याने दुपारच्या सुमारास ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या पोलिस क्वॉर्टरवरून खाली उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या सचिनला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...