आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वादोन वर्षांनी भुजबळ अधिवेशनात, सत्ताधाऱ्यांकडून स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेली दोन वर्षे तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी आगमन झाले. भुजबळ अधिवेशनाच्या कामकाजात २ वर्षात पहिल्यांदाच पूर्णपणे सहभागी होत असल्यामुळे सर्वांची नजर त्यांच्यावरच खिळली होती. विशेष म्हणजे, भुजबळ विधानभवनात येताच स्वपक्षीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सत्ताधारी भाजप नेत्यांनीही त्यांचे आवर्जून स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ भुजबळांचे स्वागत केले. नंतर मुंडे यांनी सन्मानाने त्यांना सभागृहाकडे नेले. 


छगन भुजबळ यांच्या सव्वादोन वर्षांनंतरील विधानसभेत झालेल्या आगमनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांत उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांच्या या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. 'कौन आया रे कौन आया, राष्ट्रवादी का शेर आया', अशा घोषणांनी त्यांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. या वेळी आमदार राजेश टोपे, शशिकांत शिंदे, प्रकाश गजभिये यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आमदार, समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानभवनाच्या प्रवेशाद्वारावरील पायऱ्यांवर अन्न प्रशासन व संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट आणि शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी भुजबळांचे स्वागत केले. विधानसभा सभागृहात भुजबळ विरोधीपक्ष सदस्यांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसले. 

बातम्या आणखी आहेत...